share market types in marathi


प्रकार
     
         शेअर मार्केट हे मुख्यतः चार प्रकार आहे. 
1) Equity Market - इक्विटी मार्केट.
2) Currency Market - कंरशी मार्केट.
3) Commodity Market - कमोडिटी मार्केट.
4) Derivative Market - डेरीव्हेटिव्ही मार्केट.
       
          1) इक्विटी मार्केट -
                                 इक्विटी मार्केट यालाच कॅश मार्केट असेेेही म्हणतात.यामध्ये कंपन्यांच्या शेअर ची खरेदी विक्री केली जाते.ज्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये लिस्टेड आहे अश्या. या मार्केट मध्ये बरेच सेक्टर आहे . आयटी , फार्मा ,बँकिंग अशा बऱ्याच सेक्टर मधील शेअर आपण खरेदी विक्री करू शकतो. इक्विटी चे प्रमुख दोन निर्देशांक आहे निफ्टी आणि सेन्सेक्स. यावरती शेअर मार्केट खाली आहे किंवा वरती हे कळते. उदा. Hdfc , Icici bank , इन्फोसिस ,टाटा , रिलायन्स अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. कमीत कमी एक व जास्तीत जास्त कितीही शेअर घेऊ शकता. या मार्केटची वेळ सकाळी 9:15 ते 03:30 या वेळेत असते.
       2) कंरशी मार्केट -
                                यामध्ये विविध देशातील चलनाची खरेदी विक्री केली जाते. भारतीय चलन -INR ,अमेरिकी चलन -USD, युरोपियन युरो -EUR , जपानी येन -JPY , ग्रेट ब्रिटन पौंड GBP
या देशातील चलनाची खरेदी विक्री करू शकता. या मार्केटची वेळ सकाळी 09:00 ते 05:00 पर्यंत असतो.
       3) कमोडिटी मार्केट -
                                     या मध्ये वेगवेगळ्या वस्तू , मेटल्स , क्रूड ऑइल याची खरेदी विक्री केली जाते. कमोडिटी मार्केट हे सर्वात जास्त वेळ चालते. सकाळी 09:00 वाजल्यापासून तर रात्री 11:30 पर्यंत चालते. जवळपास ही वेळ 14 तास 30 मिनिटे आहे. या वेळेत थोडेफार बदल होत असतात. या मध्ये सोयाबीन , सोने, चांदी , अल्युमिनियम ,कॉपर , निकेल झिंक , क्रूड ,नॅचरल गॅस  याची खरेदी विक्री होते.
          4) डेरीव्हेटिव्ह मार्केट -
                                        फ्युचर आणि ऑपशन असे या मार्केटचे प्रकार आहे . इक्विटी मार्केट मध्ये, कंरशी मार्केट आणि कमोडिटी मार्केट मध्ये हा वेगळा सेगमेंट असतो. कंपनीच्या शेअर मध्ये फ्युचर आणि ऑपशन खरेदी करता येते.त्याचबरोबर करंशी आणि कमोडिटी मध्ये याचे पण ऑपशन आणि फ्युचर घेता येते. फ्युचर व ऑपशन हे लॉट साईझ मध्ये असते. फ्युचर मध्ये ट्रेड करायला जास्त पैसे लागतात. कारण आपण त्या शेअर चा लॉट घेत असतो .त्यामुळे आपल्याला त्या लॉट साईज मध्ये असलेली Quantity बंधनकारक असते. व याउलट ऑपशन मध्ये ट्रेडिंग करायला जास्त पैसे लागत नाही. यामध्ये रिस्क कमी व फायदा जास्त होतो. ऑपशन हा हेल्थ पॉलीशी सारखी असते..एक प्रीमियम तुम्हाला द्यावा लागतो व त्यावरती कितीही प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतो. पण यासाठी पण अभ्यास लागतो. फ्युचर आणि ऑपशन मध्ये एक्सपायरी असते , आठवड्याची व महिन्याची.
             
              शेअर मार्केट हे आठवड्याचे 5 दिवस चालतं शनिवार व रविवारी सुट्टी असती आणि गव्हर्नमेंट सुट्ट्या ही शेअर मार्केट ला लागू असतात.या दिवशी मार्केट बंद असते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या फेसबुक पेज ला visit करा.
https://www.facebook.com/SSMFINANCIAL/ आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे

SSM FINANCIAL SOLUTION
ssmfinancial


                                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

McDonald's.- Re Kroc .........Know your business

The remote of your life is in your hands

Reading books and good company are important for the future