The remote of your life is in your hands
रिमोट तुमच्याच हातात.....
आपल्या घरातील जसा टीव्ही रिमोटच्या साहाय्याने ऑपरेट केला जातो, तसाच रिमोट आपल्या जिवणाचा पण आहे. कुठलं चॅनेल लावायचं ते आपलं आपल्याला ठरवावं लागतं.....आणि ते आपल्याचं हातात असतं. टीव्ही ऑपरेट करतांना तुम्हाला कुठला चॅनेल बघायचा आहे ते तुमचं तुम्ही ठरवता. रिमोट च्या साहाय्याने चॅनेल ट्यून करता. टीव्ही वरती असंख्य चॅनेल आहे, सगळेच तुम्ही बघता का हो? तर याचं उत्तर नाही हे असतं. टीव्ही वरती न्युज , मनोरंजन, मूव्ही , मालिका असा खजिना असतो. पण यातून पण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही बघता...
जर का तुम्ही सकाळी उठल्या उठल्या वादविवाद ,भांडण, कटकट असे चॅनेल बघत असाल तर याचा परिणाम नक्कीच नकारात्मक जाणवेल. तर कसा तर जे पाहिलं जातं,ऐकलं जातं त्याचा परिणाम आपल्या विचारावर होतो. आपले विचार नकारात्मक होतात व याचा परिणाम नकळत का होईना पण आपल्या जीवनावर होत असतो. याउलट जर तुम्ही एखादे विनोदी कार्यक्रम बघत असाल त्यातून तुम्ही खळखळून हसत असाल तर हे चॅनेल नक्कीच तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करेल. काही वेळ म्युझिक ऐकल्याने पण आपल्याला एनर्जी मिळू शकती.
टीव्ही वरती चॅनल ट्यून करतांना पण ज्यातून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फायदा होईल असेच चॅनेल लावा.त्यामधून सतत सकारात्मक ऊर्जा मिळेल. नेहमी हाश्यास्पद, मोटिव्हेशनल मोव्ही , कार्यक्रम बघण्याचा प्रयत्न करा. कधीही सिरीयस , गुन्हेगारी ,भांडण-तंटे असे कार्यक्रम बघू नका. आणि न्युज पण मोठया प्रमाणावर पाहणे टाळा.
आपल्या आयुष्याचे पण असेच आहे.या ब्रह्मांडामध्ये सुख , दुःख ,आनंद या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. यातलं तुम्हाला काय पाहिजे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या आयुष्यमध्ये तुम्हाला सुखाचं चॅनेल लावायचं की दुःखाचं , आनंद मिळवायचा का नकारात्मक ऊर्जा याचं रिमोट तुमच्या हातात आहे. फक्त ते आपल्याला ऑपरेट करता आलं पाहिजे...तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, काय नाही याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे.
'देव फक्त तथास्तु म्हणतो'- मग तुम्ही सुखाची अलोचना करा नाहीतर दुुःखाची. तुमच्या मनाला जे वाटेेल तेे होणारचं. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा...व तुमच्या जीवनात तसच घडेल जे तुम्हाला पाहिजे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या फेसबुक पेज ला visit करा.
https://www.facebook.com/SSMFINANCIAL/ आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे
SSM FINANCIAL SOLUTION
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा