How much to start with in the stock market? शेअर मार्केट मध्ये सुरुवात किती रुपयांपासून करावी?

शेअर मार्केट मध्ये सुरुवात किती रुपयांपासून करावी?व कमीत कमी किती शेअर्स घेऊ शकतो ?
          सुरुवात करतांना ही 100 रुपयांपासून तुुम्ही करू शकता. याला 
कुठलेही बंधन नाही. शेअर मार्केट मध्ये अगदी 5 पैश्यापासून ते 80000 हजारापर्यंत शेअरच्या किमती तुम्हाला दिसतील. कमीत कमी एक शेअर व जास्तीत जास्त कितीही शेअर्स खरेदी करू शकता.यासाठी कुठलेही बंधन नाही. तुमच्या डिमॅट मध्ये जेवढे पैसे असतील तेवढे शेअर्स तुम्ही घेऊ शकता. इन्ट्राडे ट्रेडिंग साठी लिव्हरेज मिळतो.
             ज्या कंपन्या तुम्हाला परिचयाच्या आहे त्या शेअर्स मध्ये च सुरुवातीला ट्रेडिंग करा. ट्रेडिंग करण्यापेक्षा गुंतवणूक करा. सुरुवातीला थोडे जरी पैसे असतील तरी त्याची गुंतवणूक च करा. ट्रेडिंग करू नका. 
              थोडेच पैसे आहे म्हणून कमी किमतीच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू नका. ते पेनी स्टॉक असतात.10 रुपयाच्या आतल्या स्टोकला पेनी स्टॉक म्हणतात. या कंपन्यांमध्ये पैसे कधी बुडतील काही सांगता येत नाही. पैसे कमी असतील तरी चांगल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा. कधीही 100 रुपयांपासून पुढच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक ही फायदेशीर व नफा देनारी ठरते.

          इन्ट्राडे करावं की डिलिव्हरी?
              इंट्राडे करणं हे सोपं नाही. त्याला शेअरमार्केट चे ज्ञान लागते , टेक्निकल Anylisis , सपोर्ट , रेसिस्टन्स , 52 वीक हाय , लो या सगळ्या गोष्टींचा ताळा किंवा हे जर येत असतील तर तुम्ही इन्ट्राडे करू शकता.अन्यथा पैसे लॉस झाल्याशिवाय राहणार नाही.
              नवीन ( beginner ) लोकांनी सुरुवातीला इन्ट्राडे करूच नये. लॉंगटर्म साठीच पोसिशन घ्यावी . 6 महिने वर्षभर ठेवून यात चांगले रिटर्न्स मिळतील.
              अनुभवाने माणसं शिकत असतात. एकदा अनुभव आल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकता. इन्ट्राडे मध्ये पण आज ही बरेच लोक पैसे कमावतात. पण अनुभव आणि नॉलेज लागत. इन्ट्राडे मध्ये पैसे जाण्याची भीती जास्त असते. डिलिव्हरी किंवा लॉंग टर्म पोसिशन घेणे कधीही चांगले व सुरक्षित असते.

         शॉर्ट सेल किंवा शॉर्ट करणे ?
               शॉर्ट सेल म्हणजे  एखाद्या कंपनीचे शेअर्स विकणे होय. म्हणजे त्या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे नसताना देखील आपण ते विकू शकतो. याला शॉर्ट सेल किंवा शॉर्ट करणे असे म्हणतात.
              एखाद्या वेळेस त्या कंपनीचे तिमाही रिसल्ट जर निगेटिव्ह आले किंवा त्या कंपणीबद्दल वाईट बातमी आली तर अशा वेळेस त्या शेअर्स मध्ये मोठी घसरण होते. अशावेळेला तुम्ही शॉर्ट सेल हा पर्याय वापरून सुद्धा पैसे कमवू शकता. पहिले सेल करून त्या शेअर ची किमंत कमी झाली की बाय करू शकता. तिथे तुम्हाला नफा मिळतो.
               वरच्या किमतीला विकणे आणि खालच्या किमतीला खरेदी करणे . शेअरमार्केट मध्ये वरती जाताना पण पैसे कमवता येतात. व  मार्केट खाली पडतांना पण पैसे कमवता येतात.
What Is Short Selling Meaning? Example Of Shorting | StockManiacs
                  
             

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

McDonald's.- Re Kroc .........Know your business

The remote of your life is in your hands

Reading books and good company are important for the future