McDonald's.- Re Kroc .........Know your business
तुमचा उद्योग ओळखा.... McDonald's चे संस्थापक रे कोर्क....
रे कोर्क हे एका मार्केटिंग कंपनी साठी काम करायचे,ज्युस बनवण्यासाठी जो मिक्सर लागतो त्या मिक्सर ची विक्री रे हे करायचे. तिथून पुढे त्यांनी मॅकडोनाल्ड ही रेस्टॉरंट कंपनी सुरू केली.सर्वप्रथम मॅकडोनाल्ड या कंपनीने हॅमबर्गर बनवले. रे कोर्क सांगतात की तुमचा उद्योग तुम्ही ओळखला पाहिजे , आपल्या व्यवसायाप्रति आपला दृष्टिकोन हा सजग असला पाहिजे.
रे कोर्क हे एका कॉलेज समारंभाला गेले असता एमबीए च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी आली , त्यांनी अतिशय सुंदर अस भाषण रे यांनी केले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा ग्रुप खाली थांबला होता.रे यांना भेटण्यासाठी बरेच विध्यार्थी त्याठिकाणी थांबले होते. रे खाली आले आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले...... बोलता बोलता रे यांनी त्या विध्यार्थ्यांना प्रश्न विचारला की माझा व्यवसाय कोणता आहे.? विद्यार्थ्यांना समजेना की रे आपल्याला अस काय विचारत आहेत.यावर विद्यार्थी हसले देखील, तरी रे यांनी परत तोच प्रश्न विचारला की माझा बिझनेस काय? विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं सर तुमचा बिजनेस कोणी पण सांगेल हॅमबर्गर चा....रे यांनी उत्तर दिलं......नाही
माझा बिजनेस हा रिअल इस्टेट चा आहे. मॅकडोनाल्ड हा जरी माझा बिझनेस असला तरी माझा रिअल इस्टेट हा मुख्य बिझनेस आहे. मॅकडोनाल्ड ही फास्टफूड व्यवसायात जरी असली तरी मॅकडोनाल्ड च्या फ्रेंच्याइझी ह्या जगभरात पसरलेल्या आहे. आणि मॅकडोनाल्ड ही ज्या व्यक्तीला फ्रेंच्याइझी देते, ती प्रॉपर्टी मॅक्डोनाल्ड स्वतः विकत घेऊन देते. मॅकडोनाल्ड चे जेवढे शॉप जगभरात आहे .तेवढे स्वतःच्या मालकीचे आहे. म्हणजे रे यांचा बिझनेस जरी हॉटेलिंग या क्षेत्रात असला तरी त्यांचा महत्वाचा बिझनेस हा रिअल इस्टेट क्षेत्रातला आहे. चांगल्या ठिकाणी फ्रेंच्याइझी देने म्हणजे त्या उद्योगाचे अर्धेयश. मॅकडोनाल्ड च्या जेवढ्या फ्रेंच्याइझी आहे त्या सर्व शहरातील मोक्याच्या ठिकाणी आहे. रे यांना रिअल इस्टेट मधून सर्वात जास्त नफा मिळतो. म्हणून रे सांगतात तुम्ही तुमचा बिझनेस ओळखा.
म्हणजे माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे यांच जिवंत उदाहरण म्हणजे रे हे आहे.जी व्यक्ती हॉटेलिंग क्षेत्रात काम करती, त्या व्यक्तीचा रिअल इस्टेट मध्ये पण व्यवसाय असू शकतो ही कल्पना पण आपण करू शकत नाही.....व्यवसाय छोटा किंवा मोठा असू शकतो पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर कितीही छोटा व्यवसाय हा खूप मोठा होऊ शकतो.....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन लेख पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला visit करा।।।।।
https://www.facebook.coUm/SSMFINANCIAL/आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे
SSM FINANCIAL SOLUTION
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा