Reading books and good company are important for the future

तुमचं भविष्य हे या दोन गोष्टीनी बदलू शकतं....

        पुस्तके - तुम्ही आता वाचत असलेली पुस्तके तुमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करेल हे नक्कीच. असं म्हटलं जातं की चांगले पुस्तके माणसाला जिवन जगताना, आपल्याला माणसं वाचायला शिकवतं, चांगलं ज्ञान देतं , काय चांगलं काय वाईट हे ठरवण्याची दिशा देतं. ज्यांनी पुस्तके वाचून मस्तके घडवली त्या मस्तकांपुढे हे जग नतमस्तक होतं. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे वाचन केले पाहिजे पुढील भविष्यात हेच आपल्याला कामी पडणार आहे.तुम्ही आता कुठली पुस्तके वाचता यावर तुमचं भविष्य नक्कीच ठरलेलं आहे...तुम्ही जर श्रीमंतीचे , पॉसिटीव्ह थिंकिंग , मोठमोठया लोकांची चरित्रे वाचत असाल तर तुमच्या भविष्यामध्ये याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल.
       आज जी काही लोकं Succesful झाली त्यांची पहिली सवय जर कुठली असेल तर ती म्हणजे पुस्तके वाचणे. मोठमोठे बिझनेसमन , तज्ञ , राजकीय नेते , अभिनेते हे सुद्धा पुस्तके वाचन करतात.प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे व्यक्तिमत्व खूप वाचन करतं. शाहरुख खान अभिनेता दररोज चार पुस्तके वाचतो. त्याच एक पुस्तक गाडीत , दुसरं सेट वर तिसरं घरी आणि चौथ टॉयलेट मध्ये सुद्धा पुस्तकं वाचतो. (अर्थात त्यांचं टॉयलेट हे खूप मोठं आहे).म्हणून आज ह्या व्यक्ती एवढ्या उंचीवर पोहचल्या आहे..
नक्कीच वाचन हे आपल्याला पण मोठ्या उंचीवर पोहचवेल......वाचाल तर वाचाल.......
         संगत - दुसरी गोष्ट म्हणजे संगत याचा पण आपल्या जीवनावर महत्वपूर्ण फरक पडतो.
         'आदमी की पहचान उसके संगत से होती है.'
माणूस ज्या वातावरणा मध्ये राहतो त्या वातावरणाचा त्या व्यक्तीवरती फरक पडत असतो. जर का संगत तुम्ही चांगल्या लोकांची केली तर तुमच्यावर पण तसाच प्रभाव पडतो. अस म्हटलं जातं की जैसी संगत वैसी रंगत. जर का श्रीमंत लोकांच्या संगती त तुम्ही वर्षभर राहिले तर तुम्ही पण श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत ही चांगल्या लोकांची करा, ज्यातून तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रता मूर्खाशी करू नका. उद्योजकांच्या संपर्कात तुम्ही राहिले तर नक्कीच तुम्ही चांगले उद्योजक बनू शकता. एका चांगल्या इंजिनिअर च्या सानिध्यात राहिले तर नक्कीच चांगले टेक्निशियन बनू शकता..….आपल्या जीवनामध्ये संगत , मित्रता खूप महत्वाची आहे.
        चांगली पुस्तके आणि चांगली संगत आपल्या पुढील भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे....पुस्तकं वाचनाची सवय आपण लावली पाहिजे आणि चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहील पाहिजे यांतच आपले हित आहे....माणसाला दोनचं गोष्टी ज्ञान देतात वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसं. तुम्ही करोडपती माणसाच्या संगतीत रहा करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला visit करा।।।।।
https://www.facebook.com/SSMFINANCIAL/  आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे

SSM FINANCIAL SOLUTION


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

McDonald's.- Re Kroc .........Know your business

The remote of your life is in your hands