अजून पण शेअरमार्केट गुंतवणूक करायला लोकं का घाबरतात.? गैरसमज -
मार्केटबद्दल अजूनही लोकांच्या मनात गैरसमज आहे. मार्केट म्हणजे जुगार , सट्टा आहे. लागला तर लागतो असा चुकीचा समज लोकांच्या मनात आहे. शेअरमार्केट मध्ये फक्त पैसे लॉस होतात. पैसे मिळत नाही.शेअरमार्केट साठी खूप पैसे लागतात. साधारण माणसाचे काम नाही , श्रीमंत माणसेच फक्त शेअरमार्केट मध्ये काम करू शकतात.असे गैरसमज असल्यामुळे शेअरमार्केट ला नाव ठेवली जातात.
रिस्क -
शेअरमार्केट मध्ये रिस्क आहेच , पण कूठलाही
व्यवसाय , धंदा यामध्ये रिस्क ही असतीचं. रिस्क शिवाय पैसे मिळत नाही. रिस्क शिवाय कुठेही पैसे मिळणार नाही. शेअरमार्केट अजून पण रिस्क वाटती. शेअरमार्केट मध्ये रिस्क ही नाही असे मी म्हणणार नाही. पण लोकांना भीती आहे. शेअरमार्केट मध्ये पैसे लॉस होण्याची.
अज्ञान -
शेअरमार्केट मध्ये हौसे , नवसे , गवसे येतात. काही काळासाठी येतात. काहींना फायदा होतो , काहींना तोटा होतो , काही म्हणतात चांगले आहे , काही म्हणतात खराब आहे. काही लोक हौस म्हणून मार्केट मध्ये येतात. काही लोकं करिअर म्हणून मार्केट मध्ये येतात. काही शेअरमार्केट मध्ये पैसे कमावण्याचे हेतूने येतात. पण Learning शिकायला कोणच तयार नाही...... फक्त आम्हाला पैसे मिळावे हाच हेतू असतो.
नवीन लोक मार्केट मध्ये येणार दुसऱ्याच्या सांगण्यावरून शेअरमार्केट मध्ये ट्रेड घेतात, खरेदी करतात ,आणि लॉस करून घेतात.कधी - कधी फायदा होतो पण तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. शेअरमार्केट मध्ये खरी गरज आहे ती शिकण्याची , नॉलेज ची. शेअरमार्केट मध्ये फंडामेंटल , टेक्निकल याला खूप महत्व आहे. आजच्या जगात शेअरमार्केट नी बऱ्याच लोकांना करोडपती बनवले आहे.
घोटाळे ( scam)-
शेअरमार्केट मध्ये यापूर्वी झालेले घोटाळे पण याला कुुठेतरी कारणीभूत ठरतात.
हर्षद मेहता असेल , केतन पारेख यांचे करोडो रुपयांचे घोटाळे यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही. लोकांना अजूनही वाटतं की scam घोटाळे अजून ही होतात. शेअरमार्केट हे लीगल आहे. पहिल हे व्यवहार कागदावर चालायचे पण आता हे सगळं डिजिटल स्वरूपात झाले आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये शेअर्स दिसतात. आता कागदावर नाही तर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये हे सगळं दिसतात. यामुळे घोटाळे होण्यास प्रतिबंध घातला गेला.
Fundamental फंडामेंटल आणि Technical टेक्निकल अँन्यालिसिस -
फंडामेंटल अँन्यालिसिस - मूलभूत विश्लेषण
फंडामेंटल अँन्यालिसिस म्हणजे
एखाद्या कंपनीच्या आकडेवारी वरून त्या कंपनीचे अँन्यालिसिस करणे होय. कंपनीचा प्रॉफिट आणि लॉस ,त्या कंपणीवरील कर्ज , बॅलन्स शीट , उद्योग , उद्योगाची वाटचाल , टर्नओव्हर या आकडेवारी वरून अँन्यालिसिस केले जाते यालाच फंडामेंटल अँन्यालिसिस असे म्हणतात.
आपण यावरून कंपनीची ग्रोथ , कंपनीमध्ये लॉंग टर्म गुंतवणूक करावी की नाही हे ठरवू शकतो.
Technical टेक्निकल अँन्यालिसिस -
टेक्निकल अँन्यालिसिस हे
कंपनीच्या डेटा वरती अवलंबून असते.थोडक्यात काय तर मागच्या किमतीवर अवलंबून असते. 52 आठवड्याचा उच्चांक , 52 आठवड्याची सर्वात कमी किंमत , सपोर्ट ,रेसिस्टंस यावरती केलं जातं..थोडक्यात काय तर टेक्निकल हे मागच्या डेटा वरती अवलंबून असते. आपण यावरून भविष्यात हे शेअर्स कुठल्या उंचीवरती जाईल हे निश्चित करू शकतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या फेसबुक पेज ला visit करा.
https://www.facebook.com/SSMFINANCIAL/ आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
https://bit.ly/2Kdys85 cont: 72-7878-5050
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे
SSM FINANCIAL SOLUTION
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा