share market basic knowledge in marathi.
शेअर मार्केट बेसिक मराठीमध्ये.
जुगार ,सट्टा , अशा विविध नावानी प्रचलित असणाऱ्या मार्केट ला शेअर मार्केट असे म्हणतात. शेअर मार्केट लीगल आहे आणि ते सेबी (SEBI) यांच्या अंतर्गत चालत. जवळपास 1956 पासून शेअर मार्केटचा इतिहास आहे. शेअर मार्केट मध्ये विविध कंपन्यांचे शेअर घेणे आणि विकणे याचा व्यापार चालतो. थोडक्यात काय तर येथे खूप मोठ्या प्रमाणावर घेणारे पण असतात आणि विकणारे पण असतात. शेअर मार्केट मध्ये कोणी घ्यायला येतं कोणी विकायला.
ज्या कंपन्यांची शेअर ची मागणी जास्त त्या शेअर चा रेट वाढत जातो. व विकणारे जास्त झाले की त्या शेअर ची किंमत कमी होती.
पूर्वी कुठलेही शेअर घेतले की त्याचे सर्टिफिकेट मिळायचे परंतु या 10 - 15 वर्षात तेही डिजिटल झाले. ते आपल्याला आपल्यालाच डिमॅट अकाउंट मध्ये दिसतात.
शेअर ही एक तुमची प्रॉपर्टी आहे. जसे सोने ,रियल इस्टेट ,घर ही जशी प्रॉपर्टी आहे तशी तुम्ही घेतलेले शेअर ही तुमची मालमत्ता आहे...यावर तुम्हाला लोन पण मिळतं. ज्या कंपनीचे शेअर तुम्ही घेता त्या कंपनीचे शेअर होल्डर तुम्ही होता.म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे पार्टनर होता.
शेअर म्हणजे काय ? शेअर म्हणजे भाग/ हिस्सा त्या कंपनीमध्ये तुमची असलेली गुंतवणूक म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही पार्टनर होता. त्या कंपनीला होणार फायदा हा तुमचाही फायदा असतो.तो डिव्हिडंड स्वरूपात तुम्हाला प्राप्त होतो.तुमचा जेवढा हिस्सा त्या कंपनीमध्ये असेल त्या पटीमध्ये तुम्हाला त्याचे फायदे मिळतील.
आजही भारतामध्ये शेअर मार्केट चे ज्ञान खूप कमी लोकांमध्ये आढळते .भारतात फक्त 4% लोकांचे डिमॅट अकाउंट आहे. आजही भारतासारख्या देशात अनेक लोकांमध्ये शेअर मार्केट बद्दल संभ्रम आहे .आजही लोक मार्केट मध्ये यायला घाबरतात. हीच परिस्थिती बघता युरोपियन देशात
हा आकडा जवळपास 60% च्या वरती आहे. अमेरिका सारख्या देशात शेअर मार्केट एक व्यवसाय म्हणून केला जातो. त्यांचा हा एक बिझनेस आहे.
आजही मार्केट मध्ये नवनवीन लोकं येतात. कुठेलेही नॉलेज न घेता , दुसऱ्याच्या सांगण्यावरून ट्रेडिंग करतात आणि मार्केट मध्ये लॉस करून घेतात. याच कारणावरून शेअर मार्केट ला नाव ठेवली जातात. शेअर मार्केट जुगार आहे , सट्टा आहे .इथे फक्त पैसे जातात अशी लोकांची धारणा होऊन बसती.
चांगले नॉलेज घेऊन मार्केट मध्ये या.तुम्ही ज्या क्षेत्रांत काम करत असाल त्या कंपन्यांची तुम्हाला माहिती असेल त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करा.....दुसऱ्या च्या सांगण्यावरून शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करू नका....
बँकेतील F. D मध्ये तुम्हाला 7% पर्यंत रिटर्न मिळतील .एखादी आरडी असेल त्यावर पण तुम्हाला जवळपास 7 % पर्यंत च रिटर्न मिळतात.सेविंग अकाऊंट असेल तर 4 % रिटर्न तुम्हाला मिळतात. पण शेअर मार्केट मध्ये हेच जर का चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 13 -15 % पर्यंत रिटर्न मिळू शकतात.ही टक्केवारी जास्त किंवा कमी पण होऊ शकती. डिपेंडिंग असत त्या कंपनीच्या परफॉर्मन्स वरती. काही कंपन्यानी 1 वर्षांमध्ये डबल 100% पण दिले आहे.
रॉबर्ट कियोसकी सांगतात..…
पैशासाठी काम करण्यापेक्षा पैशाला कामाला लावा.
आजही लोक मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजून घ्यायला तयार नाही. कर्ज काढून घेतलेली गाडी , घर ही आपली मालमत्ता आपण समजतो .पण आपली खरी मालमत्ता ती नाही. यासाठी 'RICH DAD POOR DAD' हे पुस्तक वाचा.किंवा आमचा ब्लॉग वाचा. https://ssmfinancial.blogspot.com/2020/04/rich-dad-poor-dad-by-robert-kiyosaki.html
रॉबर्ट कियोसकी च्या जगात सांगितलेली खरी मालमत्ता....
1 ) शेअर ,स्टॉक
2) बॉण्ड्स
3) म्युच्युअल फंड / SIP
4) असा कोणताही व्यवसाय जिथे आपल्या प्रत्यक्ष उपस्थितिची गरज नाही.
5) उत्पन्न निर्माण करणाऱ्या स्थावर मालमत्ता
6) बोद्धीक संपदा (पेटंट ,लेखन यावरील इनकम )
रॉबर्ट कियोसकी च्या जगात ही खरी मालमत्ता आहे.
पैशासाठी काम करण्यापेक्षा पैशाला कामाला लावा. म्हणूनच आजच इन्व्हेस्टमेंट सुरू करा.
विचार करून , समजून ,इन्व्हेस्ट करा.
मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करताना शिस्त आणि संयम या दोन गोष्टीचे नेहमी पालन करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या फेसबुक पेज ला visit करा.
https://www.facebook.com/SSMFINANCIAL/ आपल्याला जर आमच्या सोबत शेअर मार्केट शिकायचे असेल तर आम्ही आपल्याला शेेअर मार्केटसाठी लागणारे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतो व आपल्याला ट्रेडिंग कस करायचं ते पण शिकवतो.....आजच आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद।।
निलेश शालीग्राम मेहंगे
SSM FINANCIAL SOLUTION
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा